रोहिणीताई,

सांबाराची अजुन एक पद्धत मला आवडते, ती खाली देत आहे.

चिंचेच्या कोळामधे थोडे पाणी घालुन त्यात सर्व भाज्या शिजवून घेणे. उकळी येण्यापूर्वी त्यात सांबार मसाला, धणे-जिरे पूड, मीठ घालावे. यामुळे भाज्यांमधे चिंचेचा स्वाद मुरतो. भाज्या शिजल्या की त्यात तुरीची शिजलेली डाळ घालावी. सगळ्यात शेवटी वरून फ़ोडणी घालावी. पुन्हा चवीप्रमाणे मीठ, सांबार मसाला घालणे.

या पद्धतीने केलेल्या सांबाराला दाक्षिणात्य सांबाराप्रमाणे चव येते.

स्मिता.