हा अर्थातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. आजकाल "भारताच्या लोकसंख्येचा भारताला चांगला उपयोग करता येईल.." असे सगळीकडे चर्चिले जाते. पण हे कटु सत्य आहे की नैसर्गिक मर्यादांमुळे पुढच्या काही वर्षात इथे भीषण परिस्थिती होईल... आणी ही परिस्थिती येऊ नये म्हणून सामान्य नागरिक काही प्रयत्न करताना दिसत नाही.. मुळात कोणत्याही शिस्तिबद्दल मनात असणारा नकारात्मक द्रुष्टिकोन हा बऱ्याच समस्यांचे मूळ आहे..
रस्ते वाहतुकीतील बेशिस्त, नियम मुद्दाम मोडण्याची मानसिकता, पराकोटीला पोचलेला भ्रष्टाचार, आपलेच पोट भरणारे पुढारी.. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सन्धीसाधू... यादी बरीच मोठी होईल...
या सर्वाविरुद्ध आवाज उठविण्याऱ्याचा "माधव आपटे" होतो.. मग या सगळ्या गोष्टींपासुन लांब जाण्याचा पर्याय कोणी निवडला तर त्याला नावे ठेवण्याचा, योग्य अयोग्य ठरविण्याचा अधिकार लोकांना निश्चितच नाही...