प्रवासी, चाणक्य, सोनाली,सुभाषचंद्र,श्रावणी,वेदू,
आभार.. 
सुभाषचंद्र,
छंदबद्ध कविता करण्याचा माझाही मानस आहे हो.. अशाच एका कवितेनंतर प्रवासी यानी सांगितल्याप्रमाणे मी तुमचा छंद्शास्त्र लेख वाचून काढला. माहीती खूप मिळाली, पण माझे होते असे कि छंद पकडून कविता करायला  गेले तर भावना हातातून निसटते..भावना पकडायला गेले कि छंद हातातून निसटतो..कसेबसे कसरत करुन दोन्ही पकडायला गेले तर 'यमक' दूर पळालेले असते.. एकदा खूप डोकेफोड करुन छंद, भावना, आणि यमक तिन्ही (दोन हातात दोन आणि खांदा आणि मान यामधे उरलेले एक.) पण मग कविता वाचली तर 'लॉजिक' दूर दूर पळाले होते हो.. पण तुमच्या कविता खरोखर छान असतात. मला 'आयुष्याचा डाव अघोरी' आवडते. छंदावर अभ्यास चालू आहे. हे मात्र खरे कि छंदबद्ध काव्य पटकन 'क्लिक' होते. तुमचे 'तु सुभाष' मी 'मालवून टाक दीप' च्या चालीवर म्हणून पाहीले.
आपली (कसरतपटू)अनु