अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मात्र एक गोष्ट खट्कते. अनेकदा अनेकजण असा सूर लावतात की परदेशी गेले ते देशद्रोही आणि इथे राहीले ते देशभक्त. हे अत्यंत विपरीत मत आहे.
इथे राहूनही मनाने अनेकजण परदेशात गेलेले असतात. दुर्दैवाने त्यांना भारतात रहावे लागत असते. काय करतील बिचारे? मग ते इथेच आपली प्रतिसृष्टी निर्माण करतात.
आई-बाबांचे ममा पपा होतात, जयाची जे होते आणि हेमंत चा हॅम्स होतो
हे लोक बाजार हिरव्या भाजीपाल्यान भरलेला असतानाही भारीतल्या दुकानातुन चकचकीत कागदात गुंडाळलेली भाजी आणतात, ट्माटे ओसंडुन वहात असताना पाकिट्बंद प्युरी वापरतात.
खड्ड्यांनी भरलेल्या रहदारीच्या रस्त्यातून मुलांना बाबागाडीतून फ़िरवतात
कुत्र्याशी इंग्रजीतून बोलतात
वाढदिवसाला ज्योतीने औक्षण करण्याऐवजी मेणबत्त्या फ़ुंकतात
चारचौघात शक्यतो इंग्रजीतच व अगदीच नाइलाज तर हिंदीत बोलतात.