माझंही अगदी हेच म्हणणं! आपण फक्त वाद घालण्यात एक नंबर! आपण फक्त वाद घालत बसतो, आणि बाकीच्यांनी येऊन घर धुवून नेले, तरी त्याची आपल्याला पर्वा नसते. वर आपण कधी कोणाचा मुलूख बळकावला नाही, उलट इतरांनीच आपला बळकावला, यात आपण आपला मोठेपणा मानतो, आणि आपल्याच लोकांचे पाय खेचण्यात धन्यता मानतो. स्वतः काहीही न करता इतरांनी देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे, अशी आग्रहात्मक अपेक्षा बाळगतो, आणि कोणी स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न केलाच, तर खुशाल त्याला देशद्रोही ठरवून मोकळे होतो.

देशाला NRIsची गरज नाहीये (कधीच नव्हती) - देशाला गरज आहे ती फक्त NRIsच्या तथाकथित पैशाची. उगाच नाही NRIsना Not Required Indians म्हणत! तेव्हा NRIsनी परदेशात कायम वास्तव्य करणे हे NRIs व देश दोघांच्याही दृष्टीने चांगले आहे.

- टग्या.