सर्व सहभागी नोंदकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!

कारण तुम्हा सर्वांना हा विषय महत्त्वाचा वाटतो.

ज्यांना इथे सुबत्ता, सुव्यवस्था, न्याय नसल्याचे जाणवून
देशोधडीस लागावे लागले, त्यांच्याबद्दल मला दुःख आहे.
त्यांना तिथल्यापेक्षा स्वदेशात संपन्नता, सुविधा आणि सामाजिक न्याय
उत्तम प्रकारे मिळू लागेल तेव्हा ती चुकली पाखरे स्वकोटरी परततील.
तशी स्थिती मायभूमीस पुनःप्राप्त करून देण्यास सारे निवासी
भारतीय कटिबद्ध आहेत.

मूळ प्रश्नाचे उत्तर निस्संदिग्धपणे 'अयोग्य' असे आहे.

ज्या अनिवासींना ते 'योग्य' वाटत असेल त्यांनी तसे
सकारण नोंदविल्यास त्या मुद्द्यांचा परामर्ष घेता येईल.