लई दिसांनी येनं केलं अनुताई.....

तुम्ही नव्हता तर मनोगती हसायला विसरून अफाट भांडायला लागले हो!

आता तुम्ही आलात आणि विनोदाचा छान शिडकावा झाला. छानच झालंय अनुभवकथन. तुमचा मुलाखत्या स्वतः मुलाखत द्यायला गेला की त्याच्याही मनात हेच 'डायलॉग' येत असतील या विचाराने माझी हसून हसून मुरकुंडी वळली....
नोकरीत उडी मारण्याच्या प्रयत्नाला शुभेच्छा! ( संगणक कपाळी लिहिलेल्या(की पाचवीला पुजलेल्या?) माणसाच्या नशिबातच असं उड्या मारणं असतं त्याला तो तरी काय करणार? नाही का!) लवकर आम्हाला चांगली बातमी आणि पेढे पाठवा हो!

--अदिती