त्याचे असे झाले कि हा भाग काल लिहून अप्रकाशित ठेवला होता. पण आज भाग २ लिहून पान ताजे केले तर सर्व निघून कि हो गेले!! मग शेवटी हातात आहे ते आधी दाखवावे म्हणून हा अर्धामुर्धा भाग प्रकाशित केला. मग भाग २ चे लिखाण नविन ताजे लेखन करुन त्यात कॉपी पेस्ट केले. भाग २ ला तोवर प्रतिसाद आले त्यामुले तो संपादीत करुन भाग १ चा दुवा देता आला नाही!!भाग १ ला प्रतिसाद न आल्याने त्यात दुवा दिला.
हल्ली मला मनोगतावर मोठे लिखाण लिहीताना खूप समस्या येतात. याचे कारण मनोगतावरील तांत्रिक बदल कि आमच्या कचेरीतील आगभिंत??दोनदा स्फूर्ती येऊन दोन मोठेमोठे लेख लिहीले आणि 'वाचून पहा' वर टिचकी मारल्यावर पूर्ण पान निघून गेले. 'पेज कॅनॉट बी डिस्प्लेड'. मग ते लिखाण प्रत करायला बॅक दाबले तर परत सर्व लिखाण जाऊन कोरे पान आले.