आपल्या दृष्टीने खालील लोकसुद्धा गद्दार आहेत काय?

१. नियम हे मोडण्यासाठीच आहेत अश्या धारणेने समाजात वावरणारे
२. मतदान न करणारे
३. लाच देणारे/घेणारे
४. खोटी माहिती भरून सवलती लुटणारे
५. काळ्या बाजारात माल विकणारे/घेणारे
६. भारतमातेची सेवा म्हणून किमान दोन वर्षे तरी सैन्यात काम न करणारे
७. भारताचा लोकसंख्येचा प्रश्न नजरेआड करून भरमसाठ पोरे 'काढणारे'
८. समाजात फूट पाडणारे
९. विविध गुन्ह्यांची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवणारे
१०. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, इतर राष्ट्रीय मानबिंदू/चिह्ने यांचा अपमान करणारे

यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या हातून घडली असेल तर तुम्ही स्वतःला भारतमातेचे गद्दार समजता का? समजत नसाल तर तसे का समजत नाही? समजत असाल तर या 'गद्दारी'चे परिमार्जन म्हणून काय करता?

===

भारतमातेची सध्याची जी काय परिस्थिती आहे त्याला निवासी भारतीय जबाबदार आहेत का अनिवासी? भारतमातेशी (तुमच्या व्याख्येप्रमाणे) गद्दार नसलेले लोक सदर परिस्थिती बदलण्यासाठी काय करत आहेत?

देशाबाहेर न गेलेल्यांनी आणि गेलेल्यांनी भारतमातेच्या प्रगतीसाठी काय काय काम केले आहे याची तुलना केली आहे का? असेल तर आकडेवारी द्यावी आणि/किंवा तपशील द्यावा. अशी तुलना केली नसेल तर तुमचे वरील "गद्दारी" विधान बेजबाबदारपणाचे आणि अकारण वाद वाढवणारे आहे असे का समजू नये?

===

तुमची भारतमातेची व्याख्या पुणे-मुंबई इतकीच मर्यादित आहे का? तुम्ही पुण्या-मुंबईतून उठून वीज, डांबरी सडक, एस्टी, दूरध्वनी, मोबाईल कवरेज़, दूरदर्शन नसलेल्या एखाद्या पालखी-किंवा-खुर्द खेडेगावामध्ये राहायला जाल का? नसेल तर का नाही? हीसुद्धा एक प्रकारची गद्दारी का समजू नये?