दोनदा स्फूर्ती येऊन
दोन मोठेमोठे लेख लिहीले आणि 'वाचून पहा' वर टिचकी मारल्यावर पूर्ण पान
निघून गेले. 'पेज कॅनॉट बी डिस्प्लेड'. मग ते लिखाण प्रत करायला बॅक दाबले
तर परत सर्व लिखाण जाऊन कोरे पान आले.
उपायः
- सुपूर्त करण्याआधी लिखाण संपादकामध्ये (उदा. नोटपॅड, वर्डपॅड, जीएडिट, केएडिट इ.) चिकटवा. किंवा Ctrl+A -> Ctrl+C करून ठेवा.
किंवा
- मनोगताच्या
दोन खिडक्या उघडून ठेवा. एका खिडकीत लिखाण आणि दुसऱ्या खिडकीत इतर
क्रिया(जसे की 'सुपूर्त करण्याआधी पाहा', 'सुपूर्त करा' इ.) करा. (अर्थातच या पहिल्या खिडकीतील लिखाण दुसऱ्या खिडकीत चिकटवून)
किंवा
- फायरफॉक्स मध्ये मागे-पुढे केले तरी लिखाण शाबूत राहते (चूभूद्याघ्या). फायरफॉक्स वापरा.
किंवा
- लिखाणासाठी शक्य असल्यास, बरहा, अक्षरमाला, युडिट यासारखे युनिकोड संपादक वापरा.
आपला,
(उपायसूचक) शशांक