नाव ऐकल्यासारखे वाटत आहे परंतू पूर्ण संदर्भ लागत नाही आहे. आपण कृपया त्यांच्या काही पुस्तकांची नावे देऊ शकाल का?

मध्यंतरी 'गुढयात्री' हे जी.एं.वर त्यांच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेले पुस्तक वाचनात आले होते. त्यातील शैली सुधा सुरुवातीला काहीशी जी.एं. च्या शैलीशी मिळती जुळती होती. परंतू पुढे वाचल्यावर जाणवले की ते पुस्तक जी.एं.वरील एखाद्या वैयक्तिक आकसावर लिहिले असावे. स्वतःच्या खासगी जीवनाबद्दल अत्यंत काटेकोर गुप्तता पाळणाऱ्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खासगी गोष्टी (मुख्यतः त्यांचे प्रेमप्रकरण) त्यात  दिल्या आहेत.