"भटकंती : भटाची उठाठेव" या नावाने चित्त यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा समग्र चिवडा वाचकांपुढे ठेवत अनुदिनीविश्वात प्रवेश केल्याचे (वर उल्लेखलेल्या खात्रीशीर सुत्राकडून) समजते. त्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन!

ईश्वर करो नि ही निव्वळ आरंभशूरता न ठरता त्यांचे मनोगताप्रमाणेच या अनुदिनीतही नियमित योगदान होत राहो.