या प्रश्नावर उपाय म्हणुन सोपे सोपे मराठी शब्द असलेली लहान लहान वाक्ये पाठ्यपुस्तकांमधे असावीत, त्यामुळे आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे लहान मुलांना समजेल. ही वाक्ये विविध प्रसंगांवर बेतलेली, संभाषणाच्या विविध छटा दाखविणारी असावीत. यांमधे थोडेसे अवघड परंतु हवा तो अर्थ सुंदर रितीने स्पष्ट करणारे(अर्थवाही) शब्द असण्यासही हरकत नाही. याखेरीज मोठ्या वयाच्या मुलांना जसा 'ईंग्रजी संभाषण' हा विषय असतो तसाच लहान मुलांसाठी मराठी संभाषण हा विषय असावा असे वाटते.
आता मुळ मुद्द्याबाबत थोडे - लहान मुलांसाठीची व मोठ्या माणसांसाठीची ("पचायला हलकी" आणि "पचायला जड" ) अशी भाषेची वर्गवारी कधीही करु नये असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आ. वि.
एक_वात्रट