अनुबाई, तुमी भारी लिवता आन आत्ताबी भन्नाटच लिवलं हाय तुमी! आन तुमची (मंजे तुमच्या लिवन्याची बरं का!) याद आमाला पन येत व्हती. पण ह्या बयेला मंजे आदितीला आवरा ना जरा?
का आता उगी भांडान उकरून काढाय लागलिया? म्हने..तुम्ही नव्हता तर मनोगती हसायला विसरून अफाट भांडायला लागले हो!
मंजे अनु काय मनोगतच्या शांतता कमेटी हाय का काय? आन अनु असली की भांडन होत नाय का काय? मनोगती भांडत होते, भांडताहेत आनी भांडनार हायेत. शिवाय मनोगती भांडताना हसत नाहीत म्हून कुनी सांगितले हीला? पक्के मनोगती एकवेळ हसायला विसरतील पन भांडायला नाय.
नारायण....नारायण!!