एकेकाळी मराठी वाक्यांचे इंग्रजी भाषांतर करणे कठीण जात असे. उदा. "आमच्या हिच्या हातच्या थालीपिठाची सर कश्शाकश्शाला येत नाही." किंवा "इश्श!" किंवा "गंपूच्या खेपेपासून, किनई, हे अस्संच होतंय!". (श्रेय: अर्थातच पु.ल.!*) हल्ली इंग्रजी वाक्यांचे मराठी भाषांतर करणे कठीण जाते.
"कालाय तस्मै नमः"! किंवा, "ज़माना बदल गया है"!!
- टग्या.
*यात माझी (उदाहरणांची) अधिक भर: "जळलं मेल्याचं लक्षण!**", "अडलंय माझं खेटर!", "मर मेल्या!", "माझ्या बापाचं काय जातं?" (अशा उदाहरणांत "अपौरुषेय" वाङ्मयाचा त्या प्रमाणात खूपच जास्त भरणा असावा काय?)
**याचा नेमका अर्थ आजतागायत मला कळलेला नाही. (किंवा कळला असावा अशी शंका आहे, पण खात्री नाही, आणि उघडपणे "कळला" असे कबूल करण्याचे धाडसही नाही.) तज्ज्ञांकडून यावर खुलासा होऊ शकेल काय?