मनानी आणी शरीरानी भारतात असलेल्या व्यक्तिला मी देशभक्त समजतो.
म्हणजे वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र बोस, मदनलाल धिंग्रा, स्वामी विवेकानंद हे आणि असे लोक जेंव्हा देशाबाहेर होते तेंव्हा ते देशभक्त नव्हते असे म्हणायचे आहे काय? शिवाजी महाराज आग्र्याला, सुरतेला किंवा गोळकोंड्याला गेले तेंव्हा त्यांच्या मनातली देशभक्ती एकदम शून्य झाली होती काय?
मनानी आणी शरीरानी भारतात असलेल्या व्यक्तिला मी देशभक्त समजतो.
वरील विधानावरून परदेशस्थ भारतीयांबद्दल असलेला तुमचा व्यक्तिगत आकस व्यक्त करण्यासाठी सदर व्यासपीठाचा (जे एका परदेशस्थ भारतीयाने स्वखर्चाने चालवले आहे) वापर तुम्ही करत आहात असे का म्हणू नये?
सदर चर्चा चालू करण्यामागचा आपला हेतू फारच उथळ आहे असे आपल्या विधानांवरून वाटते आहे.