माझे या विषयावरचे लिखाण म्हणजे कदाचित वरातीमागून घोडे असेल, परंतू हा दुवा आत्ताच निदर्शनास आला.
मी सर्व लेख/विचार वाचले नाहीत, त्यामुळे काही मुद्द्यांची उजळणी होणे शक्य आहे.
१. मी मराठी महोदयांचे एक पटले की भारतात भाषा, धर्म वगैरेचे सक्ती अयोग्यच आहे. कारण भारताचे स्वरूपच फार वेगळे आहे.
२. परंतु, दक्षिण भारतीयांबद्दलची त्यांची मते far fetched आहेत, असे वाटते. महाराष्ट्राने कोणाचेही अंधानुकरण न करता आपली पश्चिम भारतीय ही ओळख रुजवावी, वाढवावी आणि जोपासावी.
३. हिंदी भाषक इथे येऊन सत्यानाश करतात आणि दाक्षिणात्य इथल्या संस्कृतीशी एकरुप होतात, हे अतिशय चूक आहे. पुलंच्या इतर लेखनातला पानवाला हा "भैय्या"च असतो!
४. आर्थिक धोरणात दाक्षिणात्यांनी अशी काय मुलुखगिरी केली आहे, मला कळत नाही? संपूर्ण दक्षिणेत चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद याव्यतिरिक्त कोणतेही शहर आर्थिक्दृष्ट्या प्रगत नाही. दक्षिणेचा ग्रामिण भाग हा बिहरच्या ग्रामिण भागाइतकाच ग्रामिण आणि मागास आहे. त्यांना वेठिस धरणारे बिहारात लालू आहेत, दक्षिणेत करुणानिधी, करुणाकरन, जयललिता आहेत. फरक कुठे दिसतो? दोन्ही भागातले लोक, पोटापाण्यासाठी स्व-प्रदेश सोडून भटकत आहेत. ( आता तर या भटकण्यात काहीच गैर नाही कारण प्रांत, देश यांच्या सीमाच गळून पडत आहेत.)
४. जसे उत्तरेत मूर्ख नेते निवडून येतात, तसेच दक्षिनेतही होते. दक्षिणेतल्या तामिळनाडू आणि आंध्रामधे अनेक वर्षे चित्रपट नटांनी साम्राज्य गाजवले आहे. कर्नाटकातला सध्याचा गोंधळ तर दिसतोच आहे. केरळात कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांच्यात आलटून पालटून सत्ता असते, पण दोघेही प्रगती करत नाही. तेंव्हा उत्तर आणि दक्षिण असा आर्थिक आणि राजकिय दृष्टीकोनातून भेद करता येणार नाही. दोन्हीही एकाच माळेचे मणी.
५. जसे उत्तरेतले लोक मगृर आणि माजोरडे असतात तसेच दाक्षिणात्य लोकही फारसे सुसंकृत नसतात. बेळगावचे उदाहरण घ्या, LTTE चे उदाहरण घ्या. कायदा मोडेणे ही भारतीयांची वृतीच आहे. त्यात उत्तर आणि दक्षिण असा भेद नाही.
६. भाषेच्या जवळिकीबद्दलचे विचार योग्य आहेत. लिपीसाधर्म्यामुळे आपल्या हिंदीशी जशी जवळीक वाटते तशी इतर राज्यांना वाटणार नाही. पण दक्षिणी राज्यांसारखीच गत ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांची आहे. तिथे हिंदीला इतका कडवा विरोध का नाही? बंगलोर, हैद्राबाद येथिल बहुतांश कारभार हिंदीतच होतो. आपल्या खेड्यात गेले तर हिंदी येनारे किती लोक असतील ?
तेंव्हा हिंदीची सक्ती नको, हे त्रिवार मान्य असले तरी दक्षिणी करतात, ते योग्यच आहे, असा सूर चुकीचा वाटतो.
७. बाकी दीर्घ मुद्द्यांविषयी बोलण्यात काही अर्थ वाटत नाही, परंतू मराठी महोदयांनी हिंदी आणि उत्तर भारतीयांच्या द्वेषापोटी, जो अपप्रचार चालवला आहे, त्याला मराठी समाजातून फारसा पाठिंबा मिळेल असे वाटत नाही. ( त्याचे प्रत्यंतर आलेच असेल.) वृकोदर वगैरेंसारखी "अर्धवट माहितीवर" मते बनवणारी मंडळीच मराठी महोदयांच्या प्रचाराला बळी पडतील !