'राइट अंडर अवर नोज' चे 'नाकाखालीच' हे शब्दशः भाषांतर मलापण वाचल्यावर खटकले. पण पोलीस चिकन(मूळ कथेत गोमांस) खात असताना म्हणजे हत्यार अक्षरशः त्यांच्या नाकाखाली असताना ते हे वाक्य बोलतात हा गमतीदार प्रसंग मला गमवायचा नव्हता, म्हणून शब्दशः 'नाकाखालीच' वापरावे लागले!
गंमत म्हणजे देवधरांनी या कथेचे अनुवाद केलेले मी वाचलेले नाहीत, अन्यथा हे परत केलेच नसते. मी आपली 'मीच वाचली आणि मलाच आवडली' या रत्नपारखी आवेशाने ती इथे टाकली. असो. मला ते वाचायला आवडतील.
'गिगल' ला आवाज न करता खदखदून हसणे केले आहे ते जरा हास्यास्पद झाले आहे, पण भा.पो. करुन घ्या.
मूळ कथेचे नाव आणि लेखक दोन्ही लक्षात नाही, आणि पुस्तक जर्मनीतील वाचनालयात वाचल्याने आता परत सापडणारही नाही. पण मनोगतावर ही कथा वाचलेले लोक नक्की सापडतील. त्या कथासंग्रहात इतर कथाही सरस होत्या.