ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.तिचा देवाचा कोप वगैरेशी संबंध जोडणे सर्वथैव चुकीचे आहे. हे म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडावी आणि त्याचा संबंध जोडला जावा असे आहे. परमेश्वर कोपही करीत नाही आणि कृपाही! जे घडते ते निसर्गनियमानुसार. प्रकृती प्रतिसाद देत असते. मानवी परस्परसंबंध आणि निसर्गप्रकोप ह्याचा काहीही संबंध नाही. मानवाने आपल्या कर्माने जर नैसर्गिक समतोल बिघडवला तर निसर्गाचा त्याबाबतीत प्रकोप समजू शकू. पण जयललिता-शंकराचार्य ह्यांच्या संबंधांचे त्याला काहीही घेणे देणे नाही. हे मुळात घडले कुठे? तर इंडोनेशियाजवळ आणि त्याचे परिणाम दूरवर अंदमान-निकोबार,तामिळनाडू आणि श्रीलंकेजवळ दिसतात.
ह्या आपत्तीतून मानवतेच्या दृष्टीने आपत्ग्रस्थांना काही मदत करायची सोडून असा प्रचार करणार्या शंकराचार्यांच्या भक्तांनाच देव कळला नाही असे म्हणावे लागेल.
बाकी केऑस थिअरीबद्दल मला विशेष काही माहिती नाही.