रोहिणीताई,
जर दूध घालून वड्या करायच्या असतील तर १ भांडंभर दूध घ्यायचे. आणि १ वाटी आल्याच्या वाटणाला २ वाट्या आणि वर थोडी साखर घ्यायची. आले वाटण्यासाठी थोडे दूध घालायचे. मग कढईमधे वाटण, साखर आणि उरलेले दूध घालून उकळवत ठेवायचे. बाकी कृती वरील प्रमाणेच.
जर बिन-दुधाच्या वड्या करायच्या असतील तर आले वाटण्यापुरते पाणी घालून वरील कृतीप्रमाणे करावे. फक्त साखरेचे प्रमाण जरा वाढवावे लागेल.
आले नुसते किसून घेतले तर ते मिश्रण नीट मिळून येत नाही म्हणून त्याचे गुळगुळीत वाटण करणे चांगले.