मराठीच काय पण जगातली कुठलीही भाषा ही पुर्णतः शुध्द स्वरुपात आज असने शक्य नाही असं मला वाटतं उलट नवे नवे भाषा प्रवाह मिळाल्यामुळे ती भाषा अधिकाधीक समृध्द होत जाते असं मला वाटतं. अर्थात नवे शब्द घेताना त्यांवर जाणिवपुर्वक भाषीक संस्कार केल्यास ते शब्द त्या भाषेतील होतात.

     मराठीला नव्या जगासोबत येणाऱ्या नव्या संकल्पना सामावुन घेण्यासाठी नवी शब्द निर्मीती आताशा त्या वेगाने होत नाही असे मला वाटते. या बाबतीत स्वा. सावरकरांचे योगदान ठळक आठवते. अश्या प्रकारे नवे नवे शब्द भाषेत अधिकृत रित्या स्थापीत करण्यासाठी इंग्रजी भाषेत काही संस्था कार्यरत आहेत असं ऐकुन आहे. मागे इडली हा शब्द इंग्रजीत तसाच घेतला गेला हे सुद्धा ऐकलं. असा प्रकार आपल्या मराठीच्या बाबतीत होत नाही.

    या संदर्भात मागे द्वारकानाथजींची सावरकर जन्मभुमी प्रतिष्ठाण काम करित होती हे ऐकलं होतं.

आता आम्हाला मराठी प्रतिशब्द हवा असल्यास आपली धाव संस्कृत कडे जाते आणि अतीशय कठिण उच्चाराचा शब्द वापरला जातो. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आणि संस्कृतातील शब्द तत्सम म्हणवतात हे ठिक आहे हो पण उच्चाराचं काय? सहाजीकच आम्हा सामान्यांना सहज असलेला शब्दच अधीक जवळचा वाटतो. आणि या संस्कृत प्रतिशब्दाचं स्वरुप कित्येकदा वर्णनात्मक असतं त्यामुळे ते कससंच होतं .

 मायक्रोप्रोसेसर साठी एका दैनिकात सुक्ष्मप्रक्रियक असा निव्वळ यांत्रीकी भाषांतरीत शब्द वापरल्याचं आठवतं. क्रो या शब्दाला कावळा शब्द वापरताना आपल्याला त्या पक्षाचं वर्णन करावं लागत नाही आणि शब्द सुध्दा त्याचं काम पुर्ण करतो, ही सहजता नव्या शब्दात अपेक्षीत असते.

( आज गमभन ची खिडकी खुलत नसल्याने आज चुभुद्याघ्या)

नीलकांत