हल्ली हल्ली मनोगतावर मोठे लिखाण करताना मला खूप समस्या येतात. त्या फक्त मलाच फायरवॉल मुळे वगैरे येतात की बाकी कुणाला पण येतात?
१. लिखाण करावे ची खिडकी उघडून लिखाण करुन 'सुपूर्त करण्याआधी पहा' वर टिचकी मारल्यास 'पेज कॅनॉट बी डिसप्लेड' येते. परत टिचकी मारुन मी मागे जाते. लिहीलेले कॉपीकरते आणि खिडकी बंद करुन परत मनोगत खिडकी उघडते.
२. पण नविन उघडलेल्या खिडकीत लेखन करावे उघडून कॉपी केलेले चिकटवायला पाहिल्यास 'रिड एररः कनेक्शन रिसेट बाय पीअर' असा संदेश येतो व मागे गेल्यास मागे 'कॅनॉट बी डिसप्लेड' येते.
३. नविन खिडकी उघडून अप्रकाशित स्वरुपात एक परिच्छेद सुपूर्त केल्यास क्रिया यशस्वी होते,आणि संपादीत करुन ही क्रिया ३-४दा करुन ३-४ परिच्छेद वाढवता येतात. पण त्यापुढे गेल्यास मात्र 'कॅनॉट बी डिसप्लेड'! म्हणून हल्ली लहान लिखाणाचे पण भाग करते.
४. मला इथे संगणकावर इन्स्टॉल करण्याची परवानगी नाही, त्यामुळे बारह इ. मधे आधी लिहीणे सोडून इतर काही पर्याय आहे का?