अंजुताई,
फारच छान विषय घेतला आहे तुम्ही.
मी संध्याकाळी कामावरून माझ्या पत्नीच्या नंतर थोड्या वेळाने घरी येतो. माझी गाडी तबेल्याच्याबाहेरच उभी ठेवायला लागते. (दोन गाड्यांचा तबेला असला तरी एकच म्हणजे पत्नीच्या गाडी पुरतीच जागा जेमतेम असते. बाकी फापट पसारा ठेवला असतो.) तबेल्याचे दार उघडून आत शिरल्याबरोबर तिने काय आज स्वयपाक केला आहे हे बहुतेक वासानेच कळते. मुगाच्या डाळीची खिचडी, पिठले, फ्लॉवरची भाजी, नुसती आमटी, गरम पोळ्या, उपमा, पालकाची डाळ,दाणे घातलेली भाजी, असा नेमके वासावरून घरात शिरायच्या आधीच काय जेवण आहे याचा आडाखा बांधून मी घरात शिरतो.
अमेरिकेत सर्वसाधारणपणे भारतीयाच्या घरी जेवायला जायच्या वेळी केवळ दाराजवळ गेले की बासमती तांदळाच्या पुलावाचा वास हमखास येतो. जर आपल्याला पत्त्याबद्दल थोडीफार शंका असेल तर ती दाराजवळ आले की येणाऱ्या वासाने लगेच दूर होते.
तसाच एक आवडता वास म्हणजे घरच्या भट्टीमध्ये कुकीज किंवा ब्राउनीज भाजल्या की त्याचा घमघमाट फार मस्त असतो.
पूजेकरता लावलेल्या तुपाच्या निरांजनाचा आणि उदबत्तीचा वास तर प्रसन्न करतो. त्यात जर कापराची वडी लावली तर आणखीच मजा.
पूर्वी पुण्यात असताना लक्ष्मीरोडवर्च्या किंवा नातुबागेतल्या मेहेंदळ्यांच्या हिंदुस्थान बेकरीच्या रविवारी मिळणाऱ्या पॅटीसचा वास अजून आठवतो.
पेटतेल गाडीमध्ये स्वहस्ते भरताना त्याच्या येणाऱ्या वाफेचा वासही मला आवडतो.
कलोअ,
सुभाष