**तसेच जर संपूर्ण मराठीकरण करायचे झाले, तर मग "माझे दुसरे लफडे आहे, आणि तिला माझ्यापासून मूलही होणार आहे, तेव्हा आता तू मला सोड/मी तुला सोडतो" असे कोणा मराठी नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितले असता, त्याची मराठी बायको त्याला उत्तर म्हणून शांतपणे "रात्री जेवायला काय करू?" असे विचारेल, असे वाटत नाही.
- मूळ कथेत हे वाचल्यानंतर जास्त आश्चर्यचकित करत नाही. मेरीने जॉनसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे आणि अचानक त्याने दिलेला धक्का तिला चिडण्याचेही भान राहू देत नाही. शब्दांचा अर्थ तिला कळतो, पण या अवस्थेत आपल्यावर प्रेम करणारा जॉन(निदान तिला आधी तरी तसं वाटतं) असं करू शकेल हे तिच्या मेंदूपर्यंत पोहचत नाही. म्हणून ही 'शांत' आणि बधिर प्रतिक्रिया, असे मला वाटते.