आणखी काही बोधः
१. हत्यार बनू शकतील अशा वस्तू(उदा. लाटणे,मांसाचा मोठा तुकडा),काटा,सुरी,वरवंटा या घरात कमीत कमी असतील, असल्याच तर त्यांनी मारल्यास होणारी हानी कमी होईल या दृष्टीने पुरुषांनी सदैव जागरुक असावे. (विमानात नाही का, प्लॅस्टिकचे काटे सुऱ्या देतात..तसं. वरवंट्याऐवजी हलका मिक्सर वा आटाचक्की बाळगावी. घरात मोठा दुधी, मक्याचे कणीस वा मांसखंड आढळल्यास त्वरीत त्याचे दोन/तीन तुकडे करुन एक खाऊन टाकावा किंवा बायकोला प्रेमाने खाऊ घालावा.प्लॅस्टिकचे हलके लाटणे बाळगावे.शहाळे वगैरे चौपाटीवरच प्यावे, घरी आणायच्या भानगडीत पडू नये.छत्रीऐवजी स्वतः व इतरांना रेनकोट वापरण्यास प्रवृत्त करावे.)
२. बायको आपल्यापेक्षा किमान १ फूट कमी उंचीची बघूनच करावी, म्हणजे पटकन असा फटका मारायला हात पोहचणार नाही.