एक अर्थानं मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकत आहे
की डोळसांच्या बाजारात आंधळ्यांच्या काठ्या विकताहात?
===
बाकी लोकशाही देशात अ-लोकशाहीय मार्गाने प्रश्न सोडवण्याची पद्धत विशेष उल्लेखनीय. पण त्याचे समर्थन मात्र लोकशाहीय मार्गाने... सगळेच विचित्र... असंबद्ध ... अर्थहीन!
ज्यांनी मारहाण केली त्यांनी शिवचरित्राचा काय अभ्यास केला आहे याचे मूल्यमापनसुद्धा तुम्ही केले असेलच. तेही इथे मांडा. आधीच्या चर्चातले अनेक प्रश्न तुम्ही अनुत्तरित सोडले आहेत, त्यांची सुद्धा उत्तरे द्या.
बहुलकरांना मारहाण करण्याआधी त्यांचा लेख तुम्ही वाचला असेल असे समजतो... त्या लेखावरची तुमची टिपणे आणि तो मूळ लेख इथे प्रकाशित करा. तसेच मारहाण करणाऱ्यांनीसुद्धा तो लेख वाचला होता की नाही हे पुराव्याने इथे लिहा.
समाजात फूट पाडण्याचे काम उत्तम रितीने करता आहात, त्याबद्दल अभिनंदन.