लेख अतिशय आवडला. फारच छान झालाय. खरोखरच आपल्या कितीतरी आठवणी वासाशी निगडित असतात. आणि गंमत म्हणजे या आठवणी त्रिमित असतात.तो तो वास त्या त्या आठवणींचा संपूर्ण आलेख डोळ्यासमोर उभा करतो. अगदी हॅरी पॉटर च्या पुस्तकातल्या पेन्सिव्हमधे जसा 'मेमरीज' चा चलच्चित्रपट दिसायला लागतो तसा!
तुमचा लेख वाचताना मलापण असे अनेक चित्रपट दिसायला लागले. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातून आंबे आले की त्यांची गढी एका खोलीत घातलेली असायची. पिकणाऱ्या आंब्यांचा तो मधुर वास अजूनही आठवतोय मला... संध्याकाळी सारसबागेच्या आसपास किंवा शनिपाराजवळून गेलं की हमखास येणारा मोगऱ्याचा सुवास, श्रावणातल्या कुंद वातावरणात अजूनच कोंदून राहणारा सोनचाफ्याचा वास, सुखावून सोडणारा जुईचा मंद लाजरा गंध, ओल्या पापड्या किंवा इडलीच्या पिठाला येणारा आंबूस वास, पिठाच्या गिरणीमधे येणारा ताज्या पिठाचा वास, भुकेने कळवळून पळत घरी येताना येणारा आईने केलेल्या पोह्यांचा किंवा सांज्याचा वास, मला अतिशय आवडतो तो टर्पेंटाईनचा वास, पुस्तकांचं कपाट उघडलं की येणारा (मला आवडतो खूप आणि आईला आजिबात नाही ः( ) डांबराच्या गोळ्यांचा वास वगरे वास खूप जवळचे. पण पाण्याचा वास, पुराचा वास, सामिष अन्न शिजतानाचा वास, 'बायो' चं प्रॅक्टिकल करताना घेतलेला 'ऍसिटोकार्माईन' चा वास, सगळ्यात कहर म्हणजे माशांचा वास वगरे वास अंमळ नकोसेच असायचे.
सुखदाच्या आठवणींमघले वास वाचूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. जेवणवेळेला आता फारसा वेळ नाही ते बरंय....
पुस्तकांच्या वासाचे स्मरण ठेवणाऱ्या वाचनवेड्यांचे आभार आणि कौतुक. भाष यांच्या बासमतीच्या पुलावाची आठवण संस्मरणीय.
पु. लं चा 'आवाज आवाज' हा अप्रतिम लेख आठवला... त्यातही "वँगऱ्या चँग पर सँपल" अशा ध्वनीच्या एका आरोळीनंतर "कल्पवृक्षाच्या फुलांच्या तोंडात मारील असा भज्यांचा सुगंध"( आणि झारा पाण्यात बुडवल्यावर येतो तस चर्रर्र आवाज सुद्धा!) येत असे.
अजून सुगंध-आठवणी येऊ देत मंडळी....
अदिती