महोदय,
भगतसिंग हे बहुजन समाजात मोडत नाहीत, मग त्यांचे उदाहरण तुम्हास कसे चालते हो? उद्या चाफेकरांचे, सावरकरांचे उदारहण द्याल! अशी उदाहरणे द्यायला काहीच हरकत नाही. फक्त फुटीच्या राजकारणासाठी अशा व्यक्तींचे नाव घेऊ नका ही विनंती!
पुढचे महत्त्वाचे असे की भगतसिंगांनी संसदेत बाँब टाकताना अशी काळजी घेतली होती की एकाही व्यक्तीला इजा होणार नाही. ( त्यांनी केलेल्या स्फोटात कोणीही जखमी वा मृत झाल्या वृत्त नाही. असल्यास चूक निदर्शनास आणून द्यावी.) त्यावरुनच भगतसिंगांचा शुद्ध हेतू ध्यानात येतो. असो.
बाकी, न कळणाऱ्या वा न समजणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि आपलाच (विध्वंसक) हेका चालू ठेवायचा, हे तुमच्या नेत्यांचे तंत्र तुम्ही फारच उत्तम अनुसरले आहेत, यात शंका नाही.
मी स्वतः शिवप्रेमी -- शिव शंभो प्रेमी आणि शिवाजी महाराज प्रेमी -- आहे, म्हणून उत्तर दिले. नाहीतर, तुमच्यासारखे केवळ द्वेषाचे आणि सूडाचे विचार घेऊन वावरणाऱ्या लोकांशी "संवाद" साधणे हे माझ्या शक्तीबाहेरचे काम आहे !
राग आहेच तुमचा त्यामुळे लोभ असावा, असे म्हणत नाही !
एकनाथ फडके.