विलास,
   या अभंगाचे निरूपण खूपच छान केले आहात. 
वाचन आणि श्रवण ह्यात फरक आहे. एखादी कविता आपण वाचतो तेंव्हा ती मनात घर करेलच असे नाही. पण तीच कविता चाल लावून गाण्यातून सादर केली किंवा त्यातील गर्भितार्थ कुणी आपल्याला समजावून दिला तर ती आपल्या मनात पटकन घर करू लागते.

खरे  आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमचे हरिपाठ निरूपण. मला पूर्वी हरिपाठ आवडायचा पण फक्त म्हणायला,परंतु निरूपणामुळे आता त्यातील गहन अर्थ ही समजत आहे.

दूध/दही/लोण्याचा दृष्टांत ही सुंदर आहे. माणूस घडण्यामागे संगतरूपी विरजणाचा मोठा वाटा असतो.

भगवन्नाम हे महातीर्थ आहे..., 'वाहणे' हा पाण्याचा गुणधर्म..., गोडी/जोडी/आवडीचे विश्लेषण सुंदर आहे.

निरूपणात शब्दांचा आकार(फाँट साईज) मध्ये मध्ये कमी जास्त का झाला आहे ?

श्रावणी