कित्येक सुवास आहेत - काही माझ्या आवडीचे
लहान मुलांच्या अंघोळी नंतर येणाऱ्या त्यांच्या अंगाच्या वासाचा विसर कसा पडेल ?
पावसाळ्यात ओले चिंब झाल्यावर हातगाडी वर तळल्या जाणाऱ्या भज्यांचा वास आठवा-
होम हवन सुरू असताना समिधा व तुपाचा वेगळा सुगंध-
किंवा लहान पणी शेकोटी साठी पेटवलेल्या सायकलच्या टायरचा वास-
चुलीवर ठेवलेली मला न आवडणारी कोबी ची भाजी नेमकी जळली की येणारा वास कसा विसरू ?
माचीस पेटल्यावर गंधकाचा येणारा वेगळा वास-
कोऱ्या करकरीत नोटांचा वास कोणाला आवडत नाही ?