तो पर्यंत आपल्याला हवे असलेले हात
निघून जातात
दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून!
मग आपल्या हातात काहीच उरत नाही.
हात चोळत बसण्याशिवाय...!
हाहाहा!! बरोबर आहे हो!!!!! ः( नशिबाने प्रत्येक वेळी हुकमाचा एक्का आपल्या हातात दिला असता त्याच्या हातावर तुरी देऊन सगळेच हात सर करत गेलो असतो आपण. मग त्याच्या हाती तरी काय उरले असते हात चोळत बसण्याशिवाय??;)...
तुमच्या हातचे शब्द (की शब्दांतले हात???) हात दाखवून अवलक्षण करणार नाही याची खात्री होतीच आणि या प्रकटनानंतर (खरे तर आपण कविता हे वर्गीकरण केले नाहीत हेच योग्य आहे) तर तुमची प्रतिभा (म्हणजे टॅलेन्ट बरे!!! ;)(ह. घ्या.)) म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला म्हटल्यासारखे ठरणार आहे.
आपल्या हातांनी इतरही अनेक हातांना हात द्यावेत आणि "साथी हात बढाना" प्रमाणे मनोगताचे आणि अवघ्या जगताचे नंदनवन व्हावे हीच शुभेच्छा.
(शुभेच्छुक)चक्रपाणि
अवांतरः नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणाला होता का हो? मला विचारले असते तर मी सांगितले असते "माझ्या नावात.... हात आहे" ("मेरे पास...माँ है" च्या चालीवर ;)) ह. घ्या. सांगणे न लगे.