'माझ्या शिवप्रेमी मित्रांनो...' असा विषय पाहून आत डोकावलो खरा.  पण निराशाच झाली.

लोकांसमोर विषय मांडल्यावर त्यावरील शंकांचे निरसन करणे हे आपले उत्तरदायित्व आहे याची जाणीव ठेवा!

तुम्ही इथल्या आणि याआधीच्याही लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाहीत. याचा अर्थ तुमची भूमिका 'चुकली' किंवा 'असमर्थनीय आहे' असा होतो... मर्जी तुमची...

एकंदरीत तुमचे लिखाण 'जात्यांध' आहे असा माझा समज झालेला आहे.

अर्थात आता आपल्याकडून उत्तराची अपेक्षा नाही. कारण बेजाबदार विधाने करणारे उथळ नेते आणि तुमच्यामधे काहीही फ़रक नाही!

त्यामुळे मी तुमचे लेखन यापुढे वाचेन की नाही याची शंकाच वाटते...

सूचना- यापुढे लेखन करताना, 'मी कुणाच्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाही' अशी तळटीप देण्यास विसरू नये. अर्थात, न दिल्यास आम्ही उदार मनाने ती गृहीत धरुच.