केऑसपंथीय?? हा नवीनच शब्द ऐकला.
मी केऑसविषयीची दोन (जाडी) पुस्तके वाचली आहेत. त्यात डोळे मिटून विश्वास ठेवावा (श्रद्धा ठेवावी) असे काही आढळले नाही. सगळे व्यवस्थित भौतिकशास्त्रात (किंवा गणितात) बसणारे आहे असे वाटले. म्हणजे प्रत्येक विधानामागे प्रायोगिक पुरावा आहे, गणितीय सूत्र आहे.

भूकंप, सुनामी वगैरे देवाचा कोप आहे हे म्हणणे म्हणजे मोठाच विनोद आहे. जर जयललितांवर देवाचा राग होता तर बरोबर त्यांच्या घराखाली भूकंप करायचा होता. तिकडे इंडोनेशियात कशाला? कि नेम 'जरासा' चुकला?