हे तर मी आधी करीतच होतो. पण मुद्रित पानाच्या डाव्या-उजव्या बाजूला नको असलेला जो मजकूर मुद्रित होतो तो त्रासदायक वाटतो.तो गाळून फक्त लिखाण मुद्रित करण्याची कला जर आपणास माहित असली तर ती कळावी ह्याच साठी आपणास लिहिले होते.
कॉपी -पेस्ट करुन मुद्रणप्रत घेण्यासाठी जर आपण फॉन्ट्स उपलब्ध करुन दिलेत तर सोन्याला सुगंध!

मी महाराष्ट्रटाईम्स,लोकसत्तामधील लेख तसेच घेतो आणि मग सवडीने वाचतो. किंवा floppy मध्ये कॉपी करुन इतरांना(ज्यांच्या कडे संगणक आहे) देतो.

आपल्या प्रयत्नांबद्दल विश्वास आहे.म्हणून हे धाडस करतो आम्ही.