कुठल्याशा केऑसपंथियाने असे विधान केले आहे की ब्राझिलमधे एखादे फुलपाखरु पंख फडफडवते तेव्हा डोमिनो इफेक्ट की कायसासा होऊन त्याची परिणती टेक्ससमधे चक्रीवादळ (टोर्नेडो) होण्यात होते. आता नेहमीच तसे होते की विशिष्ट परिस्थितीत वगैरे मला माहित नाही. कुणी ह्या विद्येत तरबेज असेल तर शंकराचार्यांची अटक ते भूकंप असे घटनांची डोमिनो मालिका मांडूनही दाखवेल. ती (आपत्तीग्रस्तांची क्षमा मागून) अत्यंत मनोरंजक असेल यात शंकाच नाही. कारण कशानेही काहीही घडू शकते असे केऑस थिअरीचे विचार पूर्वी इथे वाचल्याचे स्मरते. म्हणून हा disclaimer. तसे होईल ह्यावर माझा विश्वास आजिबात नाही. असो.

मुख्य मुद्दा हा की कुणी (एक वा अनेक) देव स्वर्गात बसून भूतलावरील घटना घडवून आणतो आणि तो (किंवा ते) परमन्यायी व परमदयाळू आहे(त) ही कल्पना पूर्ण बिनबुडाची आहे असे मत असल्या घटना बघून मी बनवले आहे. असल्या प्रचंड लाटेत नास्तिक आणि धार्मिक, हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चन तितक्याच क्रूरपणे मेले आहेत. जर देव असेल तर त्याने कुठलाही भेदभाव केल्याचे दिसत नाही.
गांधींसारखे पुढारी असल्या घटनांचा बाऊ करुन लोकांना अस्पृश्यतेचा त्याग करायला उद्युक्त करत होते हे वरवर ठीक वाटले तरी त्याचे दूरगामी परिणाम वाईट आहेत. त्यातून गांधी म्हणजे साधनशुचिता परमश्रेष्ट मानणारे. त्यांनी तर असे करणे म्हणजे साक्षात भ्रष्टाचार आहे.