आता आपण "प्रतिसादाज - जनरल गाईडलाइन्स" पाहू (भारतीय भाषांतील शब्द इंग्रजी बहुवचन करताना शेवटी 'आ' का वासतात ते कळत नाही, "बहु-वचन" ऐकून "आ" वासण्याचा सास्वांच्या वर्तनाशी याचा काही संबंध आहे का? याचा शोध आम्ही घेत आहोतच)

-- ह. ह. लो. पो.

(मनोगतावर स्त्री-पुरुष समानतेचे चित्र दिसत असले तरी वास्तव संपूर्णपणे तसे नाही. नव्या स्त्री सदस्यांना काही फायदे आपोआप होतात. पुरुषवर्गाकडून तुमचे सुरुवातीचे प्रतिसाद वाचले जाण्याची शक्यता वाढते शिवाय स्त्री-सदस्यांची ऐक्यभावना आयतीच मदतीला येते. पण लक्षात ठेवा ही सहानुभूती किंवा सॉफ्ट-कॉर्नर आहे प्रसिद्धी नव्हे. पुरुष सदस्यांना ही अनुकूलता नसली तरी हा मुद्दा तसा गौणच आहे.)

--- हाहाहाहाहाहाहा!!!!!!!

काही समजले नाही तरी "वा!", "छान!" "सुंदर!", "सुरेख!" "क्या बात है!" यापैकी आळीपाळीने प्रतिसाद देता येतात. कोणते लिखाण कोणत्या प्रकारचे आहे हे समजण्याची सोय मनोगतावर आहेच, त्याचा वापर करावा. त्यामुळे एखाद्या गझलेला "छान कविता" म्हणण्यासारख्या स्वाभाविक चुका टाळता येतील.

--- ह्म्म्म्म्म्म!!!

(या पुस्तकाच्या "परिशिष्ट क" मध्ये "नेहमीचे वापरातील शब्द" आणि पर्यायी "मनोगतावर वापरायचे शब्द" यांची यादी दिलेली आहे.)

-- आता खुर्चीवरून खाली पडायचाच बाकी आहे.

पुढचा भाग कधी? पुस्तक खरेदी करण्यासाठी आगाऊ नाव-नोंदणी सुरू असल्यास माझेही नाव यादीत समाविष्ट करावे.