शशांक,
आपण प्रसिद्ध होण्यासाठी काय करावे लागते याचे अत्यंत उत्कृष्ट सिंहावलोकन करीत जो युक्तिवाद येथे कारणमीमांसे सह मांडला आहे त्याला येथल्या साहित्यात तोड नाही. आपल्या तर्कसंगत विश्लेषणाने येथल्या नवनवीन सदस्यांना काही क्षणांतच भरभरून प्रसिद्ध पावण्याची कवाडे सताड उघडली गेल्याचा आभास होत आहे. तथापि विडंबनाचे मुख्य शस्त्र व अस्त्र आपण आपल्या ह्या सिंहावलोकनातून वगळल्याने आमचे माफी सारखे सहकारीवृंद यांना आपण खचित न्याय न दिल्याची भावना माझ्या मनात येत आहे. किंबहुना विडंबन व वाङ्मयचौर्याबद्दल चार ओळी आपण आपल्या उर्वरित प्रबंधात नक्कीच समाविष्ट कराल ही आशा.
धन्यवाद !
(उफ!)