शशांकराव!
मानलं तुम्हाला. इतकं अचूक निरीक्षण आणि इतकं पांडित्त्यपूर्ण विवेचन केलं आहे तुम्ही की मी अगदी नतमस्तक आहे तुमच्यापुढे. तुमच्यासारखे थोर मार्गदर्शक लाभावेत ही मनोगतीयांची पूर्वपुण्याईच की! आता मनोगतावरचा फेरफटका अगदी सुलभ होईल हो सुज्ञ / अज्ञ किंवा नुसत्याच ज्ञ जनांना!!! ही प्रतिभा आजवर कुठे बरे दडवून ठेवली होती आपण? पुढचे भागच नाही तर पूर्ण पुस्तक वाचायला मिळण्याच्या संधीची मी अगदी आतुरतेने वाट बघतेय...
आपली (आदर-भार वाही) अदिती
ता.क. आपल्या लिखाणाचा माझ्यावरचा प्रभाव किती थोर आहे हे मी या प्रतिसादातच तुमच्या 'गाईडलाईन्स' किती 'फॉलो' केल्या आहेत हे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल. आपल्यासारखा 'गाईड' लाभतोय तर मनोगतावर एक प्रबंध लिहून एखादी विद्यावाचस्पतीची पदवी पदरात पाडून घ्यावी असा संधिसाधू स्वार्थी विचार माझ्या मनात सारखा येतो आहे. बघा करताय का मार्गदर्शन....(ह घ्या हे सां न ल)
आपली(पांथस्थ विद्यार्थिनी)अदिती