नमस्कार,
मी विवेक बुवा. मी माझ्या आजोबांवर संकेतस्थळ तयार करत असताना मला एक् फार सुंदर उपाय मिळाला युनिकोड मधून लेखन करण्यासाठी.. मी विण्डोज एक्सपी वापरतो.. भारतीय भाषांसाठी टेक्स्ट सेर्विसेस मधून हिन्दी/देवनागरी सपोर्ट कसा मिळवावा ते माहीत असेलच. या इथेच मी ते वाचले म्हणून पुन्हा देत नाही. ते झाल्यावर 'हिन्दी आयएमई' नावाचे एक सॉफ्टवेअर आहे. ते इथून डाउनलोड करा. ते इंस्टॉल करायचे.. आणि कंट्रोल पॅनेल मधून हिन्दी कीबोर्ड साठी ते निवडायचे. मग काय.. लॅंज्वेज बार मधून जेंव्हा जेंव्हा आपण हिन्दी निवडतो.. एकदम स्पेलिंगप्रमाणे लिहून येते.. बाराखडी ची मदत सुध्दा मिळते. हा मजकूर मी हा प्रकार वापरून च लिहीत आहे. आजोबांचे संकेतस्थळ सुध्दा हे वापरूनच करत आहे.
हे मनोगत संकेतस्थळ अतिशय आवडले. नंदन नावाचा माझा ईमित्र याचा सभासद आहे त्याच्या द्वारे मला हे संकेतस्थळ मिळाले. त्याला धन्यवाद. मला अजून काही माहिती मिळाली अथवा मी अडलो की येथे परत ये ईनच.
या सॉफ्टवेअर संदर्भात अजून माहिती हवी असल्यास मला ईमेल करु शकता..
धन्यवाद!!