मन पंढरीस जाते
तनु शोधते बहाणे
-- छान आहे.
एकूण 'आध्यात्मिक' अंगाने जाणारी ग़ज़ल वाटते आहे. ग़ज़लेत हे अंगसुद्धा (किंवा हे संदर्भसुद्धा) हाताळले जाऊ लागले आहे याचा आनंद आहे. आध्यात्मिक आणि ऐहिक विचारांतली (किंवा जगण्यातली) तफावत मांडण्याचा हा प्रयत्न आवडला.
अजून सहज़ता यायला हवी. 'त्यज' सारख्या शब्दांमुळे कधीकधी जडपणा येतो. थोडी मोठी बहर घेऊन रचना केल्यास आणि मग छोटी बहर हाताळल्यास हळूहळू अशी सहज़ता आणणे शक्य होईलसे वाटते. माझ्या अनुभवावरून सांगावेसे वाटले इतकेच. चू. भू. द्या. घ्या.
शुभेच्छा.