तुझं लेखन आवडलं मला. डायरेक्ट दिल से लिहिलंयस ते भिडलं कुठेतरी संवेदनांना. तुला एक सांगावंसं वाटलं गं... नात्याचं निर्माल्य होतं म्हणालीस ना, तसं नसतं गं... जी नाती निर्माल्य होण्यासाठी आपणहून तयार होतात, त्यांचा सुगंध विटून जात नाही. उलट बकुळीच्या फुलासारखा दरवळत राहतो... ते त्या सुकण्याचं पारितोषिक असतं... सुकण्याची चिंता करू नकोस.... आणि निर्माल्य होण्याच्या भितीने फुलायलाही घाबरू नकोस. निर्मळ मनाने फुलत रहा.... निर्मळ मनाने लिहीत रहा. एखाद्या वाईट अनुभवाने तुझं सगळं अनुभवविश्व नासू देऊ नकोस. हे जग सुंदर आहे. मनोगतही सुंदर आहे कारणा ते या जगाचाच एक भाग आहे. आनंदाने जगाकडे बघ, जग तुला आनंदच देईल....

तुझी(आनंदित)अदिती