मला साधारण तसाच पण जरा वेगळा प्राणी आठवला. असो.
३. उत्तरेतील बिहार आणि उप्रसारखी राज्ये साक्षात बजबजपुरी आहेत. ह्या राज्यात भ्रष्टाचार, जातीयवाद इतका फोफावला आहे की बाकी कुणी राज्ये त्याची बरोबरी करत नाहीत. दक्षिणेकडची मंडळी निदान आपली भाषा तरी महाराष्ट्रावर लादत नाहीत. उत्तरेच्या मंडळींनी मुंबईतील मराठी नष्ट केली आहे. रेल्वे विभागात मराठीच्या जागी सर्रास हिंदी वापरले जाते.
४. दक्षिणेत शिक्षणाचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. केरळ हे सर्वात साक्षर राज्य आहे. उत्तरेत बिहार वगैरे राज्यात बायकांना एकट्याने फिरणे सुरक्षित नसते अगदी पाटण्यातही. अंधार झाल्यावर तर पुरुषही बाहेर पडत नाहीत असले तिकडे राहून आलेले लोक सांगतात. दक्षिणेत तसे नाही. दक्षिणेतील सार्वजनिक वाहन व्यवस्था कितीतरी सरस आहे. बिहारमधे ती केवळ कागदावर आहे.
दक्षिणेतील दोनचार वाईट गोष्टी दाखवून ती उत्तरेतील राज्याइतकी वाईट आहे असे म्हणणे म्हणजे घरात पडलेला कागदाचा कपटा वा एखादे गुंतवळ दाखवून त्याची मोठ्या कचरा डेपोशी तुलना करण्यासारखे हास्यास्पद आहे.