गेले कितीतरी दिवस...... नाही नाही महीने झालेत मी नियमितपणे मनोगत वाचत असते,दरवेळेस कुठला लेख/कविता वाचली की प्रतिसाद द्यावा असे वाटते पण तुम्ही सगळे इतके छान लिहिता ना की मला काही सुचतच नाही ः( ......
     पण एक मात्र नक्की .. माझ्याही नकळत मी या मनोगतच्या प्रेमात पडलेय,मी लिहित नसले तरी  देखील तुम्ही लिहिलेले सगळे वाचुन मी इथला एक भाग झालेय..रोज मनोगत वर येउन वाचले नाहीतर दिवसभर चुकल्या-चुकल्या सारखे वाटत असते.