सदरहू गृहस्थांना तसल्याच एखाद्या प्राण्याचा जोरदार प्रसाद मिळाल्याने तो प्राणी आठवला का, याचे खरे उत्तर मिळणे कठिण आहे, तरीही ... असो !
* सार्वजनिक व्यवस्था
* स्त्री सुरक्षा
* जातीव्यवस्था
* हुंडा
या सगळ्या बाबीत दक्षिणेतील व्यवस्था काय आहे, हे समजण्यासाठी दक्षिणेतच रहावे लागेल. सांगोवांगीवर आलेल्या गोष्टींवर काय वाद घालणार?
सदरहू गृहस्थांना उत्तरेचा आणि दक्षिणेचा 'प्रत्यक्ष' अनुभव नाही, तरीही ऐकीव गोष्टींवर मत बनवून दक्षिण श्रेष्ठ आणि उत्तर वाईट असा प्प्रचार , भाषेवर असलेल्या प्रभुत्त्वामुळे, प्रभावीपणे करत आहेत. थोडा दोन्ही भागांचा अनुभव घेऊन मत बनवले तर ते साक्षेपी आणि वस्तुनिष्ठ असेल, असे वाटते. ( शिवाय वारंवार आठवेल असा कोणत्याही प्राण्याचा प्रसाद मिळणार नाही! )
मी स्वतः दक्षिणेत रहातो आहे. मला माझ्या महाविद्यालयाच्या कामामुळे दक्षिणेतल्या खेडोपाडी प्रवास करावा लागतो. उत्तरही मी काही काळ अनुभवलेले आहे. माझ्या अनुभवांवरुन सांगतो, की उत्तर आणि दक्षिण फारसा फरक नाही. भाषा आणि खाण्यापिण्याच्या सवयी सोडल्या तर दोन्ही प्रदेश 'टिपिकल भारतीय मानसिकतेचे' प्रदर्शन करतात. त्यात उजवे डावे शोधणे शक्य नाही.
असो.
दोन्ही प्रदेशांचा अनुभव असलेल्या लोकांनी माझ्या म्हणण्यावर मतप्रदर्शन करावे अशी विनंती करतो!