अनु,
मलाई बाहेरून विकत आणलेलीच चांगली. घरच्या मलाईची चव एवढी चांगली होत नाही. अर्थात इथे जे दूध मिळते त्यातली सगळी मलाई काढलेली असते, त्यामुळे मी बाहेरूनच आणते. शिवाय किती असेल वगैरे अंदाजाची गरज ही नाही.
यासाठी लागणारे मक्याचे पीठ उपलब्ध नसेल तर डाळीचे पीठ(बेसन) वापरले तरी चालते.
पावाचा तयार चुरा नसला तरी चालेल. एक पाव तव्यावर दोन्ही बाजूंनी लालसर रंगावर भाजून मिक्सरमधून पाव काढला कि, ताजा चुरा मिळतो. या पाककृतीसाठी अर्ध्या पावाचा चुरा पुरतो.
श्रावणी