अदितीताईंशी सहमत आहे.

 जी नाती निर्माल्य होण्यासाठी आपणहून तयार होतात, त्यांचा सुगंध विटून जात नाही. उलट बकुळीच्या फुलासारखा दरवळत राहतो... ते त्या सुकण्याचं पारितोषिक असतं...

वावा!! बहोत खूब कही!!

मात्र निर्माल्य होण्याबाबत केलेल्या विधानांचा संबंध हा एखाद्या वाईट अनुभवातून जगाबाबत वाईट मत तयार होण्याबाबत नसून वरकरणी 'कायमच्या' वाटणाऱ्या नात्यांपेक्षा कधीकधी अशी निर्माल्य होणाऱी नाती किती जास्त आनंद देऊन जातात याच्याशी आहे असे वाटते. उदाहरणार्थ एखाद्या प्रवासात भेटलेली कोणीतरी एक खास व्यक्ती जी तुमच्या मनात कायमचं घर करून राहते. काय नातं असतं तिच्याशी तुमचं? काहीच नाही. लेखात संदर्भ असलेल्या 'कायमच्या' नात्यांपैकी तर नक्कीच नाही; पण तरीही निर्माल्य झाल्यामुळे कायमचं झालेलं असं हे नातं! अशी नाती निर्मळ आणि चिरकालीन आनंद देऊन जातात.

अहो मी वर अदिती'ताई' हे संबोधन वापरलं त्यावरूनच मनोगतावरच्या नात्यांची कल्पना येते आहे, नाही का? ताई, काका-काकू, राव, पंत अशी नाती बहुदा फक्त मनोगतावरच असावीत. आणि त्यांचा गोडवाही चिरकाल आपल्या सगळ्यांना आनंद देत रहावा ही शुभेच्छा.