मला वाटते "वैष्णवांची जोडी" मध्ये जोडी या शब्दाचा अर्थ सहवास नसून आयुष्यभरात जोडलेलं (जमा केलेलं किंवा साठवलेलं) धन असा असावा. मग "नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी" याचा नीट अर्थ लागतो - नामसंकीर्तन हेच वैष्णवांनी जोडलेले असे धन आहे की ज्याच्या जोरावर अनंत पापं नष्ट होतात.
जसे - "बहुत सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठ्ली आवडी"
आमचे (पूर्वजन्माचे) (सत्कर्मे करून जोडलेले) पुण्य एवढे मोठे आहे की त्यामुळे या जन्मी आम्हाला विठ्ठ्लाची आवडी लागली.
माफ करा. माझा सन्तसाहित्याचा अभ्यास अगदी नाममात्रसुद्धा नाही. थोडासा अर्थ लागला आहे (असं वाटतंय) तो लिहिला आहे.
चू.भू.द्या̱̱.घ्या.