मला उत्तरेचा वा दक्षिणेचा अनुभव नाही हे आपण कसे ठरवले. मी दोन वर्षे दक्षिणी राज्यात काढली आहेत. माझे अनेक जवळचे नातेवाईक उत्तरेत वाढले आहेत. त्यनिमित्ताने मला उत्तरेच्या वाऱ्या घडलेल्या आहेत. मित्रमंडळी, अन्य परिचित ह्यांची मते, अनुभव इथे सर्व खोटी मानायची का? मला नाही वाटत.
आकडेवारीकडेही बघा. मागास भागात लोकसंख्या वाढीचे प्रमाण अफाट असते. आज भारतात लोकसंख्येचा विस्फोट कुठल्या राज्यात होतोय? दक्षिणेत का उत्तरेत? नवे उद्योगधंदे कुठे वाढत आहेत? कुठली राज्ये दिवाळाखोर बनत आहेत?
ह्याचा अर्थ दक्षिणेत दुधामधाच्या नद्या वहात आहेत असा नाही. पण दोन्ही प्रदेशात डावे उजवे करता येणे शक्य आहे.

केवळ वादाकरता आपण आपल्या मुद्द्याला चिकटून आहात असे वाटते.

जाता जाताः LTTE चा भारताला उपद्रव होण्याचे कारण राजीव गांधी. कारण नसताना "शांति"सेना  पाठवून ते त्रांगडे गळ्यात अड्कवून घेतले. अर्थात हे सगळे उत्तरेतच घडले.
दक्षिणेत वीरप्पन हा फरारी गुन्हेगार असतो पण बिहार वा उप्रमधे तशा "गुणवत्तेचा" इसम मंत्री असू शकतो.