दिगम्भाजी,
आपण लावलेला अर्थ मला भावला. शब्दयोजनेतील मला पडलेला प्रश्न योग्य होता याचेही समाधान लाभले.
कित्येक वेळा कीर्तनांआधी साथीला "रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ॥" हा अभंग म्हटला आहे. पण आपण दिलेली ओवी लिहिताना आठवली नाही.
माझाही संतसाहित्याचा अभ्यास वगैरे नाही. आवड मात्र आहे. मनोगतसारखे माध्यम माहितीजालावर उपलब्ध झाले. मनातील इच्छेला प्रशासकांची अनुमती आणि सद्गुरूंचे आशीर्वाद लाभले आणि ती साकार झाली. आपल्यासारखे वाचक आणि रसिक आपल्या चिंतनाची भर घालून हे चिंतन अधिक समृद्ध करत आहेत हे अधिक सुखावह आहे.
हे लिखाण कोण वाचेल असे अगदी सुरुवातीला वाटले होते. पण आपल्यासारखे दर्दी वाचक लाभताहेत हे ज्ञानदेवांच्या पुण्याईचे फळ ! असाच लोभ राहावा.