माझ्या माहितीप्रमाणे, गार्गी ही सुद्धा विदुषी होती. राजा जनकाने ज्यावेळी विद्ववत् चर्चा घडवून आणली त्यावेळी श्री याज्ञवल्क्यांस शेवटचे प्रश्न गार्गीने विचारले होते, त्या आधी ती म्हणते. "मी आता याला दोन प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे जर याने बरोबर दिली तर याला इथे वादात कोणीही हरवू शकणार नाही". या नंतरही शाकल आणि बाष्कल ऋषींनी प्रश्न विचारले आणि त्यात ते हरले.
सविस्तर माहिती, के. वि. बेलसरे यांच्या "उपनिषदांचा अभ्यास" या पुस्तकात मिळेल. (बहुतेक प्रश्नोपनिषद).
काही चुका असल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
बाकी, महीदासाची कथा वाचून एकदम "अदितीर् द्यौः..." असे वाटले
समीर